दिल्लीत इंडिया ब्लॉक व कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. याच दरम्यान दिल्लीत एका व्हॅनमध्ये पोलिसांच्या गणवेशाचे गठ्ठेच्या गठ्ठे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काँग्रेसने तो शेअर केला आहे